तुमची मुलगी लखपती होणार! १८ वर्षांची होईपर्यंत राज्य सरकार देतंय १ लाख रुपये; ‘असा करा अर्ज

Lek Ladki Yojana Apply 2025नमस्कार मित्रांनो सरकारने आतापर्यंत मुलींसाठी, महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्रासोबत अनेक राज्य सरकारनेदेखील मुलींसाठी काही खास योजना राबवल्या आहेत.महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास लेक लाडकी योजना राबवली आहे. योजनेत मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. या योजनेत मुलींना १,०१,००० रुपये दिले जातात. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात.या योजनेत तुमची लेक १८ वर्षांची होईपर्यंत पैसे दिले जातात.

हे सुद्धा बघा : या यादीत नाव असेल तर तुम्हाला मिळणार मोफत ५ लाख रुपये पर्यंत उपचार येथे बघा आपले नाव

मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना हे पैसे दिले जातात. या योजनेत मुलगी जन्माला आल्यावर ५००० रुपये दिले जातात. जेव्हा तुमची मुलगी पहिलीत जाईल, तेव्हा तिला ६००० रुपये दिले जातात. यानंतर मुलगी जेव्हा सहावीत जाईल तेव्हा ६००० रुपये दिले जातील.यानंतर मुलीचे दहावीचे शिक्षण झाल्यावर अकरावीत प्रवेश घेईल तेव्हा ८००० रुपये दिले जातील. यानंतर मुलगी जेव्हा १८ वर्षांची होईल. तेव्हा मुलींना ७५००० रुपये दिले जातील. मुलींच्या शिक्षणासाठी ही मदत केली जाते.

हे सुद्धा बघा : या यादीत नाव असेल तर तुम्हाला मिळणार मोफत ५ लाख रुपये पर्यंत उपचार येथे बघा आपले नाव

योजनेचा लाभ कोणाला मिळणार

लेक लाडकी या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. ज्या नागरिकांकडे ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाचे उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार आहे. जर तुम्हाला जुळ्या मुली असतील तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment