वडीलोपार्जित शेतजमीन,मालमत्ता विकायची आहे का? मग ‘या’ लोकांची परवानगी घेणे अनिवार्य

नमस्कार मित्रांनो भारतातील मालमत्तेच्या व्यवहारांसाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत, मात्र वंशपरंपरागत मिळालेल्या संपत्तीच्या विक्रीसाठी वेगळे नियम लागू होतात.अनेक नागरिकांना या नियमांची पुरेशी माहिती नसल्यामुळे कुटुंबांतर्गत वाद उद्भवण्याची शक्यता वाढते.त्यामुळे अशा मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी कोणत्या अटी आवश्यक असतात,हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.भारतात संपत्तीचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रमुख प्रकारांमध्ये केले जाते.

हे सुद्धा बघा : मोठी बातमी 50 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज होणार बाद इथे बघा तुमचे तर होणार नाही ना

जसे की,व्यक्तिगत संपत्ती – जी कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या नावावर खरेदी केलेली असते किंवा भेट, दान, हस्तांतरण किंवा कोणाचा हक्क सोडल्याने मिळालेली असते.वशपरंपरागत मालमत्ता – ही पूर्वजांकडून पुढील पिढ्यांना मिळणारी संपत्ती असते. अशा मालमत्तेचा कुटुंबातील चार पिढ्यांपर्यंत समान हक्क असतो.मालमत्तेवर संपूर्ण कुटुंबाचा समान अधिकार असतो.कोणत्याही एका वारसदाराला ती एकट्याने विकण्याचा अधिकार नाही.मालमत्तेच्या विक्रीसाठी सर्व वारसदारांची (मुलगा, मुलगी, इतर भागधारक) लेखी संमती आवश्यक असते.कुटुंबातील काही सदस्यांनी विक्रीस नकार दिल्यास, मालमत्ता कायदेशीररित्या विकता येत नाही.

हे सुद्धा बघा : मोठी बातमी 50 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज होणार बाद इथे बघा तुमचे तर होणार नाही ना

संमतीशिवाय मालमत्ता विकल्यास अन्य भागधारक न्यायालयात दाद मागू शकतात.अशा परिस्थितीत, विक्रीवर तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंदी येऊ शकते.कोर्टाच्या निर्णयानुसार, विनापरवानगी विकलेली मालमत्ता परत मिळवण्याचा हक्क इतर वारसदारांना असतो.दरम्यान, वंशपरंपरागत मालमत्ता विकण्यासाठी कुटुंबातील सर्व वारसदारांची संमती आवश्यक आहे.संमतीशिवाय झालेली विक्री कायदेशीर आव्हान दिल्यास रद्द केली जाऊ शकते.कायद्यांची माहिती असणे महत्त्वाचे आहे,अन्यथा मालमत्ता व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात.

Leave a Comment