आता या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत वीज प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत बदल

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज’ (Pradhan Mantri Surya Ghar Muft Bijli Yojana) योजनेने महाराष्ट्रात (Maharashtra) लक्षणीय यश मिळवले आहे.राज्य सरकार आणि महावितरणने (Mahavitaran) दिलेल्या माहितीनुसार, योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखांपेक्षा जास्त झाली असून, वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे.

हे सुद्धा बघा : काकू थांबायचं नाव घेईनात.’, ‘राधा तेरी पायल’ गाण्यावर अशाकाही नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले. “मार्केट जाम.”

राज्य सरकारने योजनेअंतर्गत १०० दिवसांत सव्वा लाख लाभार्थी आणि ५०० मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते.महावितरणने हे उद्दिष्ट अवघ्या ८२ दिवसांत पूर्ण केल्याचा दावा केला आहे.डिसेंबर रोजी योजनेचा लाभ घेणाऱ्या घरांची संख्या ७१,४३७ होती, आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता २८३ मेगावॉट होती. २६ फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांची संख्या १,२८,४७० घरांवर पोहोचली, तर वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॉट झाली. योजना १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाली होती.

हे सुद्धा बघा : काकू थांबायचं नाव घेईनात.’, ‘राधा तेरी पायल’ गाण्यावर अशाकाही नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले. “मार्केट जाम.”

योजनेच्या पहिल्या शंभर दिवसांच्या मोहिमेत, ५ डिसेंबरपर्यंत राज्यात ७१,४३७ घरांना लाभ मिळाला होता.त्यानंतर, अवघ्या ८२ दिवसांत ५७,०३३ घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले.या योजनेतील लाभार्थी कुटुंबांना आतापर्यंत एकूण ८०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या योजनेमुळे घरांना मोफत वीज मिळण्यास मदत होत आहे, तसेच सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

Leave a Comment