शेतकऱ्यांनो शेतात घर बांधत असाल तर ही माहिती नक्की वाचा अन्यथा होणार मोठी कारवाई

नमस्कार मित्रांनो गावाकडच्या शेतात टुमदार घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. स्वतःच्या शेतातून दिसणारी हिरवीगार शेती आणि शुद्ध हवा यामुळे अनेकांना शेतात घर बांधायचं आकर्षण वाटतं.मात्र, शेतजमिनीवर थेट घर बांधणं कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही.सध्याच्या कायद्यानुसार, शेतजमिनीवर थेट घर बांधणं कायदेशीर नाही. जरी ती जमीन तुमच्या नावावर असली तरी कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय त्यावर घर बांधता येत नाही.जर परवानगीशिवाय शेतजमिनीवर घर उभारले, तर प्रशासनाकडून त्या बांधकामावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही शेतजमिनीवर घर बांधण्याचा विचार करत असाल, तर आधी ती जमीन बिगरशेती (Non-Agricultural – NA) वर्गात रूपांतरित करावी लागेल.जर तुम्हाला शेतजमिनीवर घर बांधायचं असेल, तर प्रथम स्थानिक नगर परिषद, ग्रामपंचायत किंवा संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी (NOC) घ्यावी लागेल.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणी नंतर मुलगी होणार लखपती मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज

तसेच, जमीन NA प्रकारात रूपांतरित करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात.जमीन मालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)

सातबारा उतारा (7/12) व फेरफार उतारा

पिकांची व जमीन वापराची नोंद

जमीन महसूल पावत्या

सर्वेक्षण नकाशा

कोणत्याही थकबाकी किंवा कायदेशीर वादाची नोंद नसल्याचा दाखलासर्वप्रथम संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात NA परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. नंतर अर्ज मंजूर होण्यापूर्वी तहसील कार्यालयाकडून जमिनीची तपासणी केली जाते.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणी नंतर मुलगी होणार लखपती मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी NA प्रमाणपत्र जारी करतात आणि महसूल विभागात त्याची नोंद होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 23 मे 2023 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला, ज्यामध्ये बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम (BPMS) लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत बिगर कृषी वापर प्रमाणपत्रे आणि विकास परवानगी देण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे.शेतजमिनीचा वापर घर बांधण्यासाठी करायचा असल्यास संबंधित व्यक्तीकडे त्या जमिनीचा संपूर्ण ताबा असावा. संबंधित जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी आरक्षित नसावी.औद्योगिक किंवा टाऊनशिप प्रकल्पांसाठी जमीन वापरण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.एकूणच काय जर तुम्हाला शेतात घर बांधायचं असेल, तर कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता, अधिकृत परवानग्या आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. जमीन NA झाल्यानंतरच तुम्ही त्या जमिनीवर घर किंवा इतर बांधकाम करू शकता.

Leave a Comment