लाडक्या बहिणींसाठी बातमी या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 3 हजार रुपये यादी तपासा

नमस्कार मित्रांनो बहीण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना ७ मार्च रोजी फेब्रुवारी- मार्चचा हप्ता जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.महिला दिनाच्या आधी महिलांना पैसे दिले जाणार आहेत.त्यामुळे महिलांच्या खात्यात ७ मार्चपर्यंत ३००० रुपये जमा होणार आहेत.लाडकी बहीण योजनेत ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

हे सुद्धा बघा : तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे अशाप्रकारे तपासा तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात

त्यामुळे त्या महिलांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांची पडताळणी सुरु झाली आहे. जानेवारीत ५ लाख महिलांचे अर्ज बाद केलेत तर फेब्रुवारीत ४ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. एकूण ५ टप्प्यांमध्ये ही पडताळणी होणार आहे. यात ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत.

हे सुद्धा बघा : तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे अशाप्रकारे तपासा तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात

तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कर भरतात त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. महिला जर सरकारी नोकरी करत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाही.तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.

Leave a Comment