नमस्कार मित्रांनो कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन तंत्राचा अवलंब करावा, असे सरकारचे धोरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असला, तरी अनेक महिन्यांपासून अनुदान मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.मात्र, याबाबत मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 144 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.योजनेंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेतकर्यांना अनुदान दिले जाते.
हे सुद्धा बघा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! महागाई भत्त्यात झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ
ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 80 टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येते.लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची प्रतीक्षा होती. अखेर, आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षात पूरक अनुदान म्हणून 144 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे सुद्धा बघा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! महागाई भत्त्यात झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ
सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाद्वारे ड्रीपर, स्प्रिंकलर, फॉगर्स यासारख्या आधुनिक उपकरणांच्या मदतीने पाणीपुरवठा केला जातो. या योजनेत विविध प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी अनुदान रचना आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान तर बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. ठिबक-तुषार सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान तर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 25 टक्के, इतरांसाठी 30 टक्के दिले जाते.