लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये पैसे तुम्हाला मिळाले नाही घरबसल्या अशा प्रकारे बघा स्टेटस

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जूनमध्ये याबाबत घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत सहा हप्ते सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. येत्या काळात लाभार्थी महिलांना 2100 रुपयांचा लाभ मिळेल असं आश्वासनही दिलं आहे मात्र त्यासाठी बजेटपर्यंत वाट पाहावी लागू शकते.

मुख्यमंत्री फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठी अपडेट दिली आहे. 24 डिसेंबरपासून खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे.लाडकी बहीण योजनेचे पैसे मंगळवार 24 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यावर सहावा हप्ता जमा होणार आहे. काही महिलांच्या खात्यावर हे पैसे यायला विलंब झाला असू शकतो. तर काही महिलांना पैसे मिळालेले असू शकतात. तुम्हाला खात्यावर पैसे जमा झाले की SMS येईल. जर आला नाही तर तुम्ही स्टेटस कसं चेक करायचं ते सांगणार आहोत.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आता वर्षाला 15000 हजार रुपये जमा

1. तुमच्या अर्जाची स्थिती तपासासर्वप्रथम, तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही याचं स्टेटस तपासा. यासाठी तुम्हाला नारी शक्ती अॅपवर लॉगइन करावं लागेल. तो पर्याय नसेल तर तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे तुम्ही लॉगइन करून स्टेटस चेक करू शकता.मोबाइल नंबर आणि अर्ज क्रमांकाचा वापर करून लॉगिन करा.संबंधित विभागात अर्जाची स्थिती तपासा. जर अर्ज Under Review असे दाखवत असेल, तर तो प्रक्रियेत आहे. पण जर अर्ज Approved झाला असेल आणि तरीही पैसे आले नसतील, तुम्ही या गोष्टी न चुकता करायला हव्यात.2. बँक तपशील तपासाबँक खात्याशी संबंधित तपशील चुकीचे असल्यास पैसे मिळण्यात विलंब होऊ शकतो. नोंदणीकृत खाते क्रमांक, IFSC कोड आणि खातेधारकाचे नाव तपासा. या तपशीलात त्रुटी असल्यास, योजनेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून किंवा स्थानिक सरकारी कार्यालयात भेट देऊन तपशील दुरुस्त करा.3. योजनेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधालाडकी बहिण योजनेसाठी एक विशेष हेल्पलाइन उपलब्ध आहे. अर्ज स्थिती व पैसे मिळण्याविषयी अधिक माहितीसाठी हेल्पलाइनवर कॉल करा किंवा ईमेल पाठवा. तुमचा अर्ज क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर जवळ ठेवा.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आता वर्षाला 15000 हजार रुपये जमा

4. स्थानिक सरकारी कार्यालयात भेट द्याजर ऑनलाइन पर्यायाने समस्येचे निराकरण झाले नाही, तर योजनेचे काम पाहणाऱ्या नजीकच्या सरकारी कार्यालयात भेट द्या. अर्ज क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रियेला गती द्या.5. पात्रतेच्या अटींचे पालन असल्याची खात्री कराकधी कधी पात्रतेच्या अटी पूर्ण न झाल्यास पैसे अडवले जातात. तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत आणि योजनेच्या निकषांशी जुळतात याची खात्री करा.

Leave a Comment