नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर पैसा सुरक्षित आणि दीर्घकालीन फायद्यासाठी गुंतवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतात. यात तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत (Time Deposit Scheme गुंतवणूक केली तर तुम्हाला बँकांच्या एफडीपेक्षा अधिक व्याज मिळू शकते.पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही बँक एफडीप्रमाणेच आहे. मात्र ती अधिक सुरक्षित असून सरकारची हमी असलेली योजना आहे. या योजनेत 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक करता येते.
हे सुद्धा बघा : घरबसल्या मोबाईलवर मिळवा दोन मिनिटात 50 हजार रुपये कर्ज असा करा अर्ज
यामध्ये व्याजदर अनुक्रमे 6.9%, 7.0%, 7.1% आणि 7.5% इतके आहेत. तसेच, 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C अंतर्गत करसवलतही दिली जाते.जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 लाख रुपये पोस्टाच्या 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवले, तर 5 वर्षांनंतर त्याला 14.49 लाख रुपये मिळतील. यामध्ये 4.49 लाख रुपये व्याज स्वरूपात असतील. जर ही रक्कम पुन्हा 5 वर्षांसाठी गुंतवली, तर ती 21.02 लाखांवर जाईल. अशाच प्रकारे 15 वर्षांत ही रक्कम 31.50 लाखांपर्यंत पोहोचेल. जर ही प्रक्रिया तुम्ही 20 वर्षांसाठी चालू ठेवली तर अंतिम रक्कम तब्बल 44.19 लाख रुपये होईल. याचा अर्थ 10 लाखांची गुंतवणूक 20 वर्षांत चारपट होईल.
हे सुद्धा बघा : घरबसल्या मोबाईलवर मिळवा दोन मिनिटात 50 हजार रुपये कर्ज असा करा अर्ज
सरकारची हमी – तुमच्या प्रत्येक एक रुपयाची हमी ही सरकारी घेते. त्यामुळे तुम्ही विश्वासाने या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.
बँकेपेक्षा अधिक व्याजदर – तुम्हाला 7.5% व्याजदरासह अधिक परतावा देखील मिळेल. ज्यामुळे तुम्हाला पैसे गुंतवून तोटा झाला आहे असे वाटणार नाही.
करसवलत – कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभ देखील तुम्हाला मिळेल.
मुदतवाढ सुविधा – या योजनेमध्ये 5 वर्षांनंतर मुदतवाढ घेता येते.दरम्यान, दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना हा एक उत्तम पर्याय आहे. कारण फक्त या योजनेत 10 लाखांची गुंतवणूक 20 वर्षांत 44 लाखांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा पर्याय नक्कीच फायदेशीर आहे.