महावितरण ने घेतला मोठा निर्णय.! नागरिकांसाठी मोठी खुशखबर आता वीज बिल येणार खूपच कमी

नमस्कार मंडळी महावितरणने येत्या पाच वर्षांसाठी वीज दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने प्रथमच वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला असून, या कपातीचा लाभ राज्यातील 2 कोटी वीज ग्राहकांना होईल.प्रस्तावानुसार, 2025-26 ते 2029-30 या कालावधीत वीज दर 12% ते 23% कपात होणार आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना होणार आता फार्मर आयडी कार्ड वाटप

तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.प्रामुख्याने 2025-26 मध्ये जे घरगुती वीज ग्राहक 100 यूनिटपेक्षा कमी वीज वापरतात, त्यांना 15% कपात होईल.यामुळे उद्योगांना वीज दरात दिलासा मिळणार आहे. पण इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वीज दरात (Electricity Rate) वाढ होणार आहे. सध्या 7.30 रुपये प्रति यूनिट असलेला दर 35% वाढवून 9.86 रुपये प्रति यूनिट होईल.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना होणार आता फार्मर आयडी कार्ड वाटप

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, हा निर्णय नवे ऊर्जा प्रकल्प सुरू होण्यासाठी आणि कृषी पंपांसाठी सौर ऊर्जा वापरण्यामुळे घेतला गेला आहे. त्यांनी 2030 पर्यंत महाराष्ट्रातील वीजनिर्मिती क्षमता 81,000 मेगावॅटपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचेही म्हटले. नवे वीज दर 1 एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी फीडर प्रकल्प 2.0 मध्ये येत्या दोन वर्षात 16,000 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रयत्न केला जाईल, यामुळे घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना फायदा होईल, असे विश्वास पाठक यांनी सांगितले.

Leave a Comment