नमस्कार मंडळी सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने अशीच एक योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते.नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्टअंतर्गत रेशन कार्ड देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते.
गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमीत कमी किंमतीत दिले जातात.देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. कोट्यवधी लोक या योजनेचा लाभ घेतात.या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात रेशन मिळणार नाही आहे.केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी गाइडलाइन जारी केल्या आहेत. या योजनेत आता १५ फेब्रुवारीनंतर या रेशनधारकांना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते.
त्यामुळे ज्या लोकांनी ई-केवायसी केले नाही त्यांना रेशन मिळणार नाही.त्यामुळे रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे.ई-केवायसी म्हणजे तुमच्या माहिती पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तुमचे अपडेटेड कागदपत्र माहिती, कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकाची माहिती जमा करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य ते रेशन त्यांना दिले जाते.