नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत. शिवाय पेमेंट देखील केलेले आहेत,मात्र काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आलं होते.त्यामुळे अनेक शेतकरी पासून वंचित असल्याचे चित्र आहे.नवीन कंपन्यांना कोटा (Vendor List) हा उपलब्ध करून दिलेला असून व्हेंडर सिलेक्शनमध्ये त्या कंपनीची नावे समाविष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे.
हे सुद्धा बघा : घरबसल्या आता तुमच्या मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी अशी करा ऑनलाइन नोंदणी
काही कंपन्या या ठिकाणी व्हेंडर सिलेक्शनमध्ये दिसत आहे, तर काही कंपन्या या लवकरच व्हेंडर सिलेक्शनमध्ये (Solar Vendor Selection) तुम्हाला परत दिसणार आहेत.अशी करा प्रक्रिया
सर्वप्रथम https://offgridmtsup.mahadiscom.in/ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यायचं आहे.या ठिकाणी लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करत यातील अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करा.
हे सुद्धा बघा : घरबसल्या आता तुमच्या मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी अशी करा ऑनलाइन नोंदणी
यानंतर सSearch by Beneficiary ID या पर्याय समोर समोरील रकान्यात आपला आयडी टाकायचा आहे.हा आयडी टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करायचा आहे.पुढील विंडोमध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येईल, शेवटी सर्च वेंडर या पर्यायावर क्लिक करा.त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे व्हेंडर असाइनमेंट असा पर्याय दिसून येईल.यात ज्या काही कंपन्या समाविष्ट झाल्या असतील त्यांची नावे दिसून येतील.जर तुम्हाला उपलब्ध असलेली कंपनी निवडायची असल्यास ती कंपनी निवडून खाली असाईन या पर्यायावर क्लिक करायचा आहे.यानंतरही इतर कंपन्या समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वारंवार या संकेतस्थळावर जाऊन तपासणी करणे आवश्यक असणार आहे.