नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता या योजनेबाबत आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहेमिळालेल्या माहितीनुसार, या योजनेतून नुकतेच पाच लाखापेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहे. राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अपात्र बहिणांना या योजनेतून वगळण्याचे काम सुरुच आहे.
आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शाहनिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी E-KYC करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत.
- लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य केले आहे.
- राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘लाडकी बहीण योजने’वर आता आयटीची नजर आहे. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार आहे.
- लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे.
- अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
- जिल्हास्तरावरून फेरतपासणी करुन निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे.
लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.