पी एम किसान योजनेत मोठे बदल आता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने  पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan Sanman Nidhi Yojana) नवीन नियमावली लागू केली आहे. यानुसार, एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा आणि मुलगी यापैकी केवळ एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.अर्ज करताना आता पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे सुद्धा बघा : जिओ धारकांसाठी खुशखबर.! जिओने आणला 49 रुपयांचा अनलिमिटेड पॅक मिळणार इतके दिवस मोफत डेटा

तसेच, वारसा हक्काव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, ते आणि डॉक्टर, इंजिनिअर, आयकर भरणारे, पेन्शनधारकांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली सुरू केलेल्या या योजनेचा उद्देशच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.योजनेच्या सुरुवातीला एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनींसाठी वेगवेगळे अर्ज केले होते.

हे सुद्धा बघा : जिओ धारकांसाठी खुशखबर.! जिओने आणला 49 रुपयांचा अनलिमिटेड पॅक मिळणार इतके दिवस मोफत डेटा

ही बाब लक्षात घेऊनच आता सरकारने अटी कडक केल्या आहेत.दरम्यान, सध्या लाभार्थी शेतकऱ्यांना १९व्या हप्त्याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी मागील हप्ता निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात हस्तांतरित करण्यात येईल अशी दाट शक्यता आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष योजनेसंदर्भात होणाऱ्या घडामोडींकडे लागले आहे.

Leave a Comment