नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे बोलले जात होते.मात्र, ही योजना बंद होणार नसल्याचे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे.
हे सुद्धा बघा : कोणतीही परीक्षा न देता अंगणवाडीत निघाली 40 हजार पदांसाठी मोठी बंपर भरती असा करा अर्ज
या योजनेत फक्त ज्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांना पैसे दिले जातात.लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक करावे. परंतु अजूनही अनेक महिलांनी बँक खाते आणि आधार लिंक केले नाही. ज्या महिलांनी ज्या महिन्यात अर्ज केला. त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहे फक्त त्यांचे बँक अकाउंट लिंक असावे आता ज्या महिला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात बँक अकाउंट लिंक करणार आहेत.त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल. हे पैसे ज्या महिन्यात त्यांनी अर्ज केले आहेत.
हे सुद्धा बघा : कोणतीही परीक्षा न देता अंगणवाडीत निघाली 40 हजार पदांसाठी मोठी बंपर भरती असा करा अर्ज
त्या महिन्यापासून मिळणार आहे. फक्त लाभार्थी महिलांनाच हे पैसे मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरु झाली आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते. या योजनेत कधीपासून २१०० रुपये मिळणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या योजनेत २१०० रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतात.