नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांना आर्थिकदृष्या बळकट करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेला जुलै २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या योजनअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना ६ हफ्ते मिळाले आहेत.म्हणजेच आतापर्यंत एकूण ९००० रुपये जमा करण्यात आले आहेत.
काही महिलांना या योजनेचा फॉर्म भरण्यात उशीर झाला होता. तर काही महिलांनी हा फॉर्म भरलाच नव्हता. या सर्व महिला, ही फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरु होणार? याची वाट पाहत होते. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहेदिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना २ महिन्यांचा हफ्ता एकत्र देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याचा हफ्ताही अकाऊंटमध्ये आला आहे. मात्र अजूनही काही महिला आहेत, ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाहीये..अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा सुरु केली जाऊ शकते. आगामी बजेटमध्ये, महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. ही घोषणा झाल्यानंतर, पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु होऊ शकते. मात्र यासाठी त्यांना काही दिवस वाट पाहावी लागू शकते. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना १ जूलैपासून १५०० रुपये दिले जात आहेतज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
ज्या महिलांनी अर्ज भरले होते, त्यांना आतापर्यंत ९००० रुपये मिळाले आहेत.योजनेसाठी आधार लिंक असणं गरजेचंया योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड हे बँक अकाऊंटशी लिंक असणे गरजेचे आहे. याआधी १२ लाख महिला अशा होत्या, ज्यांचं अकाऊंट लिंक नव्हतं. मात्र आता त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे.