नमस्कार मित्रांनो दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर आता बारावीचा निकालही लागला आहे. त्यामुळे पुढील वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची गडबड सुरू होते. कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा झाल्यास त्याला दाखले, कागदपत्रे लागतातच.प्रवेशाची प्रक्रिया सुरू होताना अनेक विद्यार्थी कागदपत्रे, दाखल्यांबाबत संभ्रमात असतात. कधी-कधी महत्त्वाची कागदपत्रे राहून जातात, तर कधी काही महत्त्वाची माहिती भरणेही राहून जाते.अनेकदा प्रवेशावेळी दाखल्यांची गडबड होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे आतापासून काढायला सुरुवात केल्यास विद्यार्थी-पालकांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होईल.
हे सुद्धा बघा : बारावीत पास झालात आता पुढे काय? कोणता करिअर ऑप्शन ठरेल बेस्ट येथे जाणून घ्या
विविध दाखल्यांसाठी प्रशासकीय वेळ लागतात, त्यामुळे पूर्वीच दाखवे काढून ठेवणे केव्हाही चांगले.विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दहावी-बारावीची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, निवासी पत्त्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र ही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. अनेकवेळा निकालानंतर किंवा प्रवेशाच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांसह पालक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करतात. अनेक विद्यार्थी कागदपत्रे, दाखल्यांबाबत संभ्रमात असतात. कधी-कधी महत्त्वाची कागदपत्रे राहून जातात
हे सुद्धा बघा : बारावीत पास झालात आता पुढे काय? कोणता करिअर ऑप्शन ठरेल बेस्ट येथे जाणून घ्या
ही कागदपत्रे आवश्यक
डोमिसाइल-डॉगरी दाखल्यासाठी…तलाठ्यांचा रहिवासी दाखला, आधारकार्डची झेरॉक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाइड, जन्माचा दाखला.उत्पन्नाच्या दाखल्यासाठी…तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्डची झेराक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, वडिलांचा फोटोजातीच्या दाखल्यासाठी…तलाठी-सरपंच यांचा दाखला, मुलाचा व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी व वडिलांचे आधारकार्ड, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला.