तुमचे नाव मतदार यादीत आहे का? दोन मिनिटांत अशा प्रकारे तपासा!

नमस्कार मित्रांनो प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहे, पण त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. तुम्ही मतदार यादीत नाव असल्याचे खात्री करायचे असेल तर, आता तुम्ही ते घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनिटांत तपासू शकता.मतदार यादीत नाव तपासण्याची पद्धत राष्ट्रीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट वापरा

https://voters.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन National Voter Service Portal च्या अधिकृत वेबसाईटवर जा.

हे सुद्धा बघा : शेतकरी बांधवानो, मोबाईलवर मॅसेज चेक करा, नमोचा सहावा हफ्ता आला! असा तपासा तुमचा हप्ता

मुख्यपृष्ठावर ‘Search in Electoral Roll’ किंवा ‘मतदार यादीत नाव शोधा’ हा पर्याय निवडा.

तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील:

EPIC क्रमांक वापरून नाव शोधा:

तुमच्या मतदार ओळखपत्रावरील EPIC क्रमांक टाका.

सामान्य तपशील वापरून शोधा:

तुमचे पूर्ण नाव, राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र यासारखी माहिती प्रविष्ट करा.

हे सुद्धा बघा : शेतकरी बांधवानो, मोबाईलवर मॅसेज चेक करा, नमोचा सहावा हफ्ता आला! असा तपासा तुमचा हप्ता

यानंतर ‘Search’ बटणावर क्लिक करा.

जर तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर ते स्क्रीनवर झळकते.

2. मतदार यादी तपासण्यासाठी मोबाईल अ‍ॅप वापरा

राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत Voter Helpline App डाउनलोड करा.

अ‍ॅप उघडून ‘Search Your Name in Electoral Roll’ हा पर्याय निवडा.

माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची नोंद स्क्रीनवर दिसेल. Search Name in Voter list

Leave a Comment