सिबिल स्कोअर खराब होतोय? ‘या’ 5 चुका नक्की टाळा, नाहीतर कर्ज मिळणं होईल कठीण

Cibil Score 2025:- नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल युगात सिबिल स्कोअर म्हणजेच तुमचा क्रेडिट स्कोअर अत्यंत महत्त्वाचा आहे. घर खरेदीपासून ते वैयक्तिक गरजांसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जांपर्यंत, सिबिल स्कोअर हा तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा आरसा असतो.जर तुमचा स्कोअर चांगला नसेल, तर बँका किंवा वित्तसंस्था कर्ज देताना अधिक विचार करतात किंवा कर्ज फेटाळण्याची शक्यता अधिक असते सिबिल स्कोअर 750 पेक्षा अधिक असेल, तर तो चांगला मानला जातोCibil Score 2025. पण बरेच लोक काही साध्या चुका करत असल्यामुळे आपला स्कोअर नकळतपणे खराब करत असतात.

हे सुद्धा बघा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयार रहा! मे महिन्यात ‘या’ तारखेला लागणार निकाल

चला जाणून घेऊया अशाच ५ मुख्य चुका, ज्या टाळल्या पाहिजेत.तुम्ही घेतलेले कोणतेही कर्ज किंवा वापरलेले क्रेडिट कार्ड वेळेत फेडणे अत्यंत आवश्यक आहे. EMI उशिरा भरणे किंवा चुकवणे याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो. वेळेवर पेमेंट करणे ही सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी पहिली पायरी आहे.बऱ्याच लोकांना वाटतं की, क्रेडिट कार्ड म्हणजे हवे तेवढे खर्च करता येतात. मात्र, क्रेडिट युटिलायझेशन रेशो ३०% पेक्षा अधिक गेल्यास तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा आणि मर्यादेतील वापर ठेवा बरेच वेळा लोक जुनं क्रेडिट कार्ड बंद करतात, परंतु हे करताना लक्षात ठेवा की क्रेडिट लिमिट कमी झाल्यामुळे युटिलायझेशन वाढतो, आणि त्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.

हे सुद्धा बघा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयार रहा! मे महिन्यात ‘या’ तारखेला लागणार निकाल

त्यामुळे जुनं क्रेडिट कार्ड कायम ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.जर तुमच्यावर आधीच मोठं कर्ज असेल आणि तुम्ही पुन्हा नवं कर्ज घेत असाल, तर बँकांना वाटतं की तुम्ही आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहात. हे सिबिल स्कोअरवर नकारात्मक परिणाम करतं. मोठं कर्ज घेताना काळजीपूर्वक योजना आखावी.प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक किंवा वित्तसंस्था सिबिल स्कोअरची ‘हार्ड इन्क्वायरी’ करतात. जास्त हार्ड इन्क्वायरीमुळे स्कोअर घसरतो. म्हणून गरज असेल तेव्हाच कर्जासाठी अर्ज करा.

Leave a Comment