नमस्कार मित्रांनो आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) 02 लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची 01 लाख क्विंटल ची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
हे सुद्धा बघा : राज्यातील मेंढपाळांसाठी खुशखबर; ७.३३ कोटी चराई अनुदान थेट बँक खात्यात जमा
आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 700 रुपये, धुळे बाजारात सरासरी 750 रुपये, जळगाव बाजारात सरासरी 627 रुपये, नागपूर बाजारात 1250 रुपये दर मिळाला.आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला.
हे सुद्धा बघा : राज्यातील मेंढपाळांसाठी खुशखबर; ७.३३ कोटी चराई अनुदान थेट बँक खात्यात जमा
तर नाशिक बाजारात सरासरी 850 रुपये, सिन्नर बाजारात 950 रुपये, कळवण बाजारात 1100 रुपये चांदवड बाजारात 900 रुपये, गंगापूर बाजारात 850 रुपये, तर रामटेक बाजारात 1400 रुपयांचा दर मिळाला.