नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळानं मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची फाटाफूट करण्यात येणार आहे.ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, तिथे त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी नेमले जाणार नाहीत.
हे सुद्धा बघा : सोन्याच्या दरात झाली इतक्या रुपयांनी मोठी घसरण पहा आजचे ताजे दर
अन्य शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं विभागीय मंडळास दिले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा दि. 11-02-2025 ते दि. 18-03-2025 आणि दहावीची परीक्षा दि. 21-02-2025 ते दि. 17-03-2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण आणि मुंबई विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दहावी आणि बारावीसाठी राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.मात्र, परीक्षेत विविध मार्गांनी गैरप्रकार होताना दिसतात .
हे सुद्धा बघा : सोन्याच्या दरात झाली इतक्या रुपयांनी मोठी घसरण पहा आजचे ताजे दर
त्याला आवर घालण्यासाठी नऊ विभागीय मंडळे आपल्या स्तरावर विविध उपायोजना राबवत असतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये 10 वी आणि 12 वीची परीक्षा होऊ घातली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 कालावधीत कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे.