तुमच्या घरावर सोलर पॅनल असेल तर तुमच्यासाठी आली ही आनंदाची मोठी बातमी

नमस्कार मित्रांनो घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर, स्मार्ट नेट मीटर लावला, तरी ‘टीओडी मीटर्स’प्रमाणे बिल लावू नये, सध्या चालू आहे तीच पद्धत सुरू राहावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून होत आहे.अशी मागणी अनेक ग्राहक संघटना तसेच सोलर सिस्टिम इरेक्टर्सनी वीज नियामक आयोगाकडे लावून धरली होती.त्या लढ्याला यश आले असून, नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसारच लागू राहील, असा निर्णय दिला आहे. असे सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.याबाबत वेलणकर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सोलर सिस्टिम बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.जर तयार केलेली वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असेल, तर तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतील व ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत त्या युनिट्सचा वापर तो करू शकेल व वर्षअखेर जे युनिट्स त्यांच्या खात्यात जास्तीचे शिल्लक राहतील त्यांचे महावितरण ग्राहकाला पैसे देईलही यंत्रणा सुरळीत राबविण्यासाठी ‘नेट मीटर’ बसवण्यात येतात. आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसवणार आहे.

हे सुद्धा बघा : रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी बातमी; 27 मार्चपासून होणार मोठा बदल

रूफटॉप रेग्युलेशन्स 2019 च्या 11.4 ( व) प्रमाणे टीओडी मीटर्स असलेल्या ग्राहकांना दिवसाच्या काळात (म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5) सोलर सिस्टिममधून वीज तयार केली गेली असेल, त्याच काळात वापरलेल्या युनिट्सबरोबर वजाबाकी होईल आणि या काळात जी जास्तीची वीज तयार होईल आणि ऑफ पिक काळात तयार झालेली वीज म्हणून धरली जाईल.अर्थातच पिकअवर्समध्ये त्याचा सेट ऑफ मिळणार नाही. मुळातच सोलरमधून वीज फक्त दिवसा 9 ते 5 या वेळेतच तयार होते, तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत असतो. मात्र, महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात ‘ऑफ पिकअवर्स’ म्हणून सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही वेळ ठरवली आहे.

हे सुद्धा बघा : रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी बातमी; 27 मार्चपासून होणार मोठा बदल

त्यामुळे या काळातच तयार झालेली सोलर वीज त्याच काळात वापरली नाही, तर ती फक्त खात्यात दिसत राहील व वर्षाच्या शेवटी तेवढ्या युनिट्सच्या 88% युनिट्सचे 3 ते 3.50 रुपयांप्रमाणे पैसे मिळतील आणि ग्राहक संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या मुख्य वेळेत जी वीज वापरेल त्याचे त्याला बिल भरावेच लागेल आणि सोलर सिस्टिम बसवल्यामुळे वीजबिल शून्यावर येण्याचे त्याचे स्वप्न भंग पावेल. यातून ग्राहकांचा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला मिळणारा प्रतिसाद कमी होईल. याच्या विरोधात वीजग्राहक संघटनांनी वीज नियामक आयोगाकडे दाद मागितली होती. त्याला यश आले आहे, असे वेलणकर यांनी कळविले.

Leave a Comment