Home Loan 2025नमस्कार मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपोदरात पाव टक्का कपात करीत तो सहा टक्के केला आहे. या बदलामुळे बँकांचे गृहकर्ज, तसेच वाहन कर्ज स्वस्त होईल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत मिळणार आहे.अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने बुधवारी (ता. ९) रेपोदरात ०.२५ टक्के कपात केली.‘आरबीआय’कडून रेपोदरातील कपातीच्या घोषणेनंतर पीएनबी, इंडियन बँक, युको आणि बीओआय या चार सरकारी बँकांनी त्यांच्या कर्जांच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.
हे सुद्धा बघा : आनंदाची बातमी या सरकारी योजनेअंतर्गत मिळणार दर महिन्याला वीस हजार रुपये आजच करा अर्ज
अन्यही बँकांकडून अशाच पद्धतीने कपातीचा निर्णय लागू करण्याबद्दल हालचाली सुरू आहेत. ‘आरबीआय’ने फेब्रुवारीतही रेपोदरात कपात केली होती. त्यावेळी सरकारी बँकांनी त्यांच्या कर्जांच्या दरात घट केली; परंतु काही खासगी बँकांनी त्यांच्या दरात कोठेही घट केली नव्हती. अमेरिकेच्या व्यापार टेरिफमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ‘आरबीआय’च्या पतधोरण समितीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत रेपोदरात कपात करून देशाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात अखेरच्या टप्प्यात रेपोदरात कपात केली.
हे सुद्धा बघा : आनंदाची बातमी या सरकारी योजनेअंतर्गत मिळणार दर महिन्याला वीस हजार रुपये आजच करा अर्ज
त्या वेळी सरकारी बँकांसह काही बोटावर मोजण्याइतपत बँकांनी कर्जाचे दर कमी केले होते. परंतु, अमेरिकेच्या टेरिफ पॉलिसीचे पडसाद सध्या जगभरात पाहायला मिळत आहेत. अशा वेळी ‘आरबीआय’चा रेपोदरातील कपातीचा निर्णय हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयानंतर खासगी बँकांना त्यांच्याकडील ग्राहकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी कर्जांच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरेल.