Rain In Maharashtraनमस्कार मित्रांनो राज्यातील कोकण-गोवा भागात सोमवार (ता. १४) आणि मंगळवारी (ता. १५), तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.तर विदर्भातील चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पुढील २४ तासांत कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून त्यानंतर अंतर्गत महाराष्ट्रात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानातही पुढील तीन दिवस एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात रविवारी दुपारी अनेक गावांत गारपीट व पाऊस झाला.
यात केळी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, रावेर आदी भागांत रविवारी गारपीट, वादळी पाऊस झाला. अनेक गावांत अर्धा तास गारा व पाऊस पडला. यात सुमारे पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांची हानी झाली. तसेच कलिंगड , खरबूज, वेलवर्गीय पिकांना फटका बसला. कांदा, मका, बाजरी या पिकांचेही नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील रानवड मंडळात दुपारी जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला