बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देत आहे 50 हजार रुपयांचे अनुदान बँक खात्यात असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाइप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता येते .आता यात बोअरवेल (Boarwell) समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी ५० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभदिला जात आहे. याअंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत. गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्याव्हा.

हे सुद्धा बघा : आता घरबसल्या करा तुमच्या सातबाऱ्यावर विहीर आणि बोरवेलची नोंदणी इथे जाणून घ्या प्रक्रिया

काय आहेत निकष ?

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

अर्ज करणारा शेतकरी हा असूचित जमातीमधील असावा.

पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा.

अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये.

शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा आणि आठ अ हे त्याच्याच नावाने असावे.

पात्र अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे

बोअरवेलच्या लाभासाठी अर्जदाराचे आधारकार्ड

जातीचा दाखला

उत्पन्नाचा दाखला

सात बारा व आठ-अ

दारिद्रयरेषेचे कार्ड

हे सुद्धा बघा : आता घरबसल्या करा तुमच्या सातबाऱ्यावर विहीर आणि बोरवेलची नोंदणी इथे जाणून घ्या प्रक्रिया

अर्जदाराचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र

पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)

०.४० हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला

शेतात विहीर नसल्याचा दाखला.

५०० फुटांच्या अंतरावर कुठचीही विहीर नसल्याचा दाखला (विहिरीसाठी),

कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र,

संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र,

जागेचा फोटो,

ग्रामसभेचा ठराव

अर्ज कसा कराल?

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय दिसेल त्याला ओपन करायचे आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा सीएस्सी केंद्रावर संपर्क करावा.

Leave a Comment