नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत मोठी घोषणा करत बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ 45 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना आता 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे,त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र 16,000 मेगावॅट कृषी वीज पुरवठा करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
हे सुद्धा बघा : तरुणांना मिळणार दर महिन्याला 5 हजार रुपये ऑनलाईन अर्ज झाले सुरू असा करा अर्ज
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज सोलर पॅनेलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणपूरक उपाययोजना शक्य होतील.घरगुती ग्राहकांसाठी मोठी घोषणा करत 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत वीज देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच विजेच्या किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.राज्यातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
हे सुद्धा बघा : तरुणांना मिळणार दर महिन्याला 5 हजार रुपये ऑनलाईन अर्ज झाले सुरू असा करा अर्ज
2030 पर्यंत महाराष्ट्रातील 52% वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून तयार केली जाणार आहे. यात सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि अन्य नवीकरणीय स्रोतांचा समावेश असेल. भविष्यात डेटा सेंटर ही सर्वाधिक श्रीमंत आणि महत्त्वाची गुंतवणूक असेल. त्यांना आवश्यक वीज पुरवण्यासाठी राज्य सरकार विशेष नियोजन करणार आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 24 तास वीज मिळेल, घरगुती ग्राहकांना मोफत वीज योजनेचा फायदा होईल आणि वीजदर कमी ठेवण्याचा प्रयत्न सुरू राहील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने लोकांना दिलासा मिळणार आहे.