नमस्कार मित्रांनो लोन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करताय, किंवा घेण्याचा विचार करत आहात. तर ही बातमी तुम्हाला आनंद देणारी ठरणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी रेपो रेट निश्चित केलं जाणार आहेत.शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये (MPC) रेपो दर कपातीची घोषणा केली जाऊ शकते.यासह गृहकर्ज EMI देखील सुमारे 5 वर्षांमध्ये प्रथमच कमी होऊ शकतो.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा.! योजनेबाबत आली आताची सर्वात मोठी अपडेट
आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीचा पहिला निर्णय उद्या शुक्रवारी सकाळी घेतला जाणार आहे.जर आरबीआय रेपो रेटमध्ये अनुमानित 25 बेसिस पॉइन्टसमध्ये कपात करू शकते. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण गेल्या दोन वर्षांपासून मध्यवर्ती बँकेने रेपो दर स्थिर ठेवलाय. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन कर प्रणाली अंतर्गत कर सवलतीसह सरकारच्या घसरत्या महागाई आणि वाढ समर्थक उपाययोजनांद्वारे हे पाऊल उचलले गेले आहे.रेपो रेट रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँका किती दराने कर्ज घेतात हे ठरवतो आणि त्याचा थेट कर्जदरांवर परिणाम होत असतो. रेपो दरांमध्ये कपात केल्याने सामान्यत कर्ज घेण्याच्या खर्चात घट होत असते.किरकोळ आणि कॉर्पोरेट कर्जदारांना फायदा होत असतो.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा.! योजनेबाबत आली आताची सर्वात मोठी अपडेट
वापराला चालना देण्यासाठी सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत जाहीर केली.जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर बाजारात आनंदाच वातावरण असेल. ऑक्टोबर 2024 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई दर 6.2% वरून डिसेंबर 2024 मध्ये 5.2% पर्यंत घसरून महागाई कमी होत आहे. जर महागाई आटोक्यात राहिली तर आणखी दर कपात होऊ शकते.रेपो रेट कपातीमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. विशेषकरून फ्लोटिंग रेट होम लोन, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जे घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे. बँका ग्राहकांना किती लाभ देतात हे पत मागणी, ठेवींची वाढ आणि एकूण तरलता परिस्थिती यासारख्या घटकांवर अवलंबून असते.