शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हजार रुपये होणार जमा इथे बघा पात्र शेतकरी

नमस्कार मित्रांनो केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीव्हीसी (PVC) आणि एचडीपीई पाईपसाठी (PVC-HDPE Pipe Subsidy Scheme) अनुदान दिले जाते.महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत संदेश येण्यास सुरुवात झाली आहे.अनेक दिवसांपासून महाडीबीटीची (MahaDBT) लॉटरी (Lottery) लागण्यास अडचणी येत होत्या, मात्र आता हळूहळू काही योजनांच्या लॉटरी लागत आहेत.

हे सुद्धा बघा : या नागरिकांना सरकार देणार नाही पीएम आवास योजनेचे पैसे यादीत तुमचे नाव तर नाही येते तपासा

सिंचन विभागातील योजनांच्या लॉटरीला (Pipeline Scheme Update) सुरुवात झाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना: या योजनांतर्गत, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना पीव्हीसी (PVC) आणि एचडीपीई (HDPE) पाईपसाठी (Pipe) 428 रुपये प्रति मीटरपर्यंत 100% अनुदान दिले जाते.सर्वसाधारण गट: सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना एचडीपीई (HDPE) पाईपसाठी (Pipe) 50 रुपये प्रति मीटर आणि पीव्हीसी (PVC) पाईपसाठी (Pipe) 35 रुपये प्रति मीटर अशी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

हे सुद्धा बघा : या नागरिकांना सरकार देणार नाही पीएम आवास योजनेचे पैसे यादीत तुमचे नाव तर नाही येते तपासा

म्हणजेच, सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना जवळपास 15 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.जर तुम्हाला या योजनेअंतर्गत मेसेज आला असेल, तर आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा आणि कोटेशन तत्काळ अपलोड करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळेल. पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावी लागेल आणि त्याचे बिल पुन्हा महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल. त्यामुळे वेळेवर योग्य प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment