नमस्कार मित्रांनो सध्या लग्नसराई सुरु आहे. अशात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे.सोन्याच्या दरात गेल्या 10 दिवसांत तब्बल 48300 रुपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोनं सोमवारी (19 मे) 95510 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी प्रति 1 किलो 96900 रुपयांवर ट्रेड करत आहे. कालच्या (18 मे 2025) तुलनेत आज (19 मे) सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे.8 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 99600 रुपये होता.
तर 18 मे रोजी हा दर घसरून 95130 रुपयांवर खाली आला. त्यामुळे 10 तोळ्यांच्या दरात मोठा फरक पडला आहे. ही मे महिन्यातील सर्वात मोठी घसरण असल्याचे मार्केट एक्स्पर्ट सांगत आहेत. हेही वाचा…सोन्याचे दर 88000 रुपयांपर्यंत गडगडणार, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडणारदरम्यान, गेल्या 10 दिवसांतील सोने-चांदीच्या दरात झालेली घसरण पाहाता, सध्या सोनं खरेदी करणे हे गुंतवणुकीच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते. मात्र, खरेदीपूर्वी अधिकृत सोने विक्रेत्यांकडून दर आणि शुद्धतेची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
24 कॅरेट सोनं:
1 ग्रॅम – 9551 रुपये.
10 ग्रॅम – 95510 रुपये.
100 ग्रॅम – 955100 रुपये.
22 कॅरेट सोनं:
1 ग्रॅम – 8755 रुपये.
10 ग्रॅम – 87550 रुपये.
100 ग्रॅम – 875500 रुपये.
18 कॅरेट सोनं:
1 ग्रॅम – 7163 रुपये.
10 ग्रॅम – 71630 रुपये.
100 ग्रॅम – 716300 रुपये.
आजचा चांदीचा दर (Silver Price Today):
1 ग्रॅम – 96 रुपये 90 पैसे.
1 किलो – 96900 रुपये.