नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीमुळे दागिने खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. पण उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात आता घसरण झाली आहे. सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहेगुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांची घसरण झाली आहे आणि या घसरणीनंतर 24 कॅरेट, 22 कॅरेट तसेच 18 कॅरेट सोन्याचा दर काय आहेत.
हे सुद्धा बघा : फार्मर आयडी कार्ड मंजूर झाल्यानंतर पुढे कशाप्रकारे डाउनलोड करायचं इथे बघा प्रक्रिया
गुरुवारी (6 मार्च 2025) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 4900 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,79,800 रुपयांवरुन 8,74,900 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 87,980 रुपयांवरुन 87,490 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.