नमस्कार मित्रांनो महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकूल लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रासप्रमाणे महिन्यातून एकदा १० ब्रास मिळणार आहे. वाळू धोरण अजून अंतिम न झाल्याने त्या ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत.घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे,तर इतरांना महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू सवलतीच्या दरात मिळणार आहे. त्यासाठी शासनाच्या ‘महाखनिज’ ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे.
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होणार
त्यासाठी मिळकत उतारा, लाभार्थीचे आधारकार्ड, बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे.वाळू ठेक्याची प्रतिब्रास किंमत १३७ रुपये, ६०० रुपये रॉयल्टी, १० टक्के डीएम (जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी), स्वॉप्टवेअर कंपनीचे चार्जेस, असे मिळून साधारणत: साडेबाराशे ते तेराशे रुपयांपर्यंत प्रतिब्रास वाळू मिळणार आहे.
हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होणार