नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने २ कोटी घरे बांधण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सुरू करण्याची घोषणा केली आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या घरकुलाच्या सर्वेक्षणासंदर्भात मोठी ओरड होती.प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले किंवा सिस्टीमद्वारे अपात्र झालेल्या लोकांनाही घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांनी घरकुलाचा लाभ यापूर्वी घेतला नाही आणि कच्या घरात ज्यांचे राहणे आहे, अशा लोकांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे.
हे सुद्धा बघा : मुलीसाठी पैसे जमा करताय तर मग आताच या सरकारी योजनेला अर्ज करा व मिळवा 70 लाख रुपये
आता घरकूल आम्हाला मिळाले नाही, अशी ओरड कायमची थांबणार आहे.आपल्याला घरकूल हवा असेल, तर ‘आवास प्लस २०२४’ या अॅपवर जाऊन १ एप्रिल २९२५ पासून अर्ज करू शकता. त्या अर्जाची चाचणी होईल. हे अर्ज ग्रामीण भागातील नागरिकच करू शकतात. या योजनेचा लाभअधिक लोकांनी घ्यावे, असे आवाहन ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले आहे.आपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी हा या घरकुलांचा सर्वेअर राहणार आहे.नागरिकांनी ‘आवास प्लस २०२४’ या अॅपवर स्वतः अर्ज करावे किंवा आपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी यांच्याकडून अर्ज करून घ्यावे.
हे सुद्धा बघा : मुलीसाठी पैसे जमा करताय तर मग आताच या सरकारी योजनेला अर्ज करा व मिळवा 70 लाख रुपये
पात्र असलेल्या आणि अचूक माहिती भरणाऱ्या नागरिकाला घरकुलाचा लाभ हमखास मिळणार आहे, असे विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे यांनी सांगितले.सन २०१८ च्या घरकुलाच्या यादीत ज्यांचे नाव घरकुलासाठी आले नाही आणि ज्यांना घरकुलाची गरज आहे. अशा सर्वांना केंद्र शासनाकडून घरकूल देण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी घरकुलासाठी सेल्फ अर्ज करावे किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे घरकुलासाठी अर्ज करावे