नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड हे आपल्या देशातील अनेक कुटुंबांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं ओळखपत्र आणि गरजेचं साधन आहे. या कार्डमुळे सरकारकडून स्वस्त दरात धान्य मिळण्यास मदत होते. पण अनेकदा असं होतं की, आपण रेशन दुकानात जातो आणि रेशन कार्ड घरीच विसरलेलं असतं.किंवा काहीजणांनी अजून रेशन कार्ड काढलेलंच नसतं. मग अशावेळी काय करायचं? धान्य मिळणार नाही का?काळजी करू नका! भारत सरकारने रेशन कार्ड धारकांच्या सोयीसाठी एक खास मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘Mera Ration 2.0’. हे ॲप म्हणजे तुमच्या रेशन कार्डची डिजिटल प्रतच आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप असेल आणि प्रत्यक्ष रेशन कार्ड तुमच्याजवळ नसेल, तरीही तुमचं काम होऊ शकतं! फोनवर रेशन कार्ड कसं मिळवाल?
जर तुम्ही रेशन दुकानात गेलात आणि रेशन कार्ड घरी विसरला असाल, तर तुम्ही खालीलप्रमाणे तुमच्या फोनवरच रेशन कार्ड दाखवून धान्य मिळवण्याचा प्रयत्न करू शकता:
तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store किंवा Apple App Store वरून ‘Mera Ration 2.0’ हे ॲप डाउनलोड करून इंस्टॉल करा.
ॲप उघडल्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकण्यास सांगितलं जाईल. तो तिथे टाका.
आधार नंबर टाकल्यावर ‘Login with OTP’ या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून लॉगिन करा.
लॉगिन यशस्वी झाल्यावर, तुमचं डिजिटल रेशन कार्ड आणि त्यावरील सर्व माहिती ॲपमध्ये उघडेल.
आता तुम्ही हे ॲपमधील डिजिटल रेशन कार्ड रेशन दुकानदाराला दाखवून, तुमच्या हक्काचं धान्य मिळवण्यासाठी विचारू शकता.
नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?
जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल आणि सरकारी ऑफिसच्या चकरा मारायच्या नसतील, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाइटवरून (https://rcms.mahafood.gov.in/) किंवा आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करू शकता.