नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. नोकरी करुन देशसेवा करण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही आर्मीत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत १७२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बँक ऑफ महाराष्ट्रने विविध स्केल II, III, IV, V, VI, आणि VII अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तुमचीही या पदांशी संबंधित पात्रता असल्यास, तुम्ही bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.भरतीतून एकूण १७२ पदे भरायची आहेत. यामध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी आहे. उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार सूचना वाचा आणि अर्जाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
पात्रता
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह किमान बीटेक किंवा बीई पूर्ण केलेले असावे. परीक्षेसाठी नोंदणी करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतून ज्या पदासाठी ते अर्ज करू इच्छितात त्या पदासाठीचे शैक्षणिक निकष तपासले पाहिजेत.वयोमर्यादा: पदावर अवलंबून उमेदवारांचे वय २२ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते. “पात्रता निकष (वय, पात्रता, कामाचा अनुभव) आणि इतर तपशीलांसाठी कट-ऑफ तारीख ३१.१२.२०२४ आहे,” अधिकृत सूचना सांगते.