आता तुमच्या व्हाट्सएपवर मिळणार सर्व शासकीय प्रमाणपत्र सरकार करणार ही सुविधा सुरू

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी डिजिटल सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रमाणपत्रे डाउनलोड करणे, सरकारी योजनांची माहिती मिळवणे आणि बस तिकिटे बुक करणे आता सहज शक्य होईल.महाराष्ट्र सरकारने Meta सोबत भागीदारी करत “आपले सरकार” नावाचा नवीन AI Chatbot लॉन्च करण्याची घोषणा केली आहे राज्यातील नागरिकांना सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा, तसेच वेळ आणि कागदपत्रांची बचत व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर घरकुल योजनेचे पैसे या नागरिकांच्या खात्यात झाले जमा लवकर यादीत नाव बघा

व्हाट्सअ‍ॅप हा सर्वात जास्त वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे आणि आता यावरच थेट सरकारी सेवा देखील मिळू शकणार आहेत.महत्त्वाची प्रमाणपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा (उदा. जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र)

शासकीय योजनांची माहिती मिळवण्याची सोय

ST महामंडळाच्या बस तिकिटांचे बुकिंग

तक्रारी नोंदवणे आणि त्यावर त्वरित कारवाई

WhatsApp वर “आपले सरकार” चा वापर कसा कराल?“आपले सरकार” हा AI-आधारित Chatbot मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध असेल.नागरिक टेक्स्ट किंवा व्हॉइस कमांडच्या माध्यमातून सहज संवाद साधू शकतील.एका क्लिकमध्ये हवी ती माहिती मिळवता येईल आणि गरजेची कागदपत्रे डाउनलोड करता येतील.

हे सुद्धा बघा : मोठी खुशखबर घरकुल योजनेचे पैसे या नागरिकांच्या खात्यात झाले जमा लवकर यादीत नाव बघा

बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ST महामंडळाच्या तिकिट बुकिंगची सुविधा असणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “ही नवी सेवा म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा आहे. जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी जनरेटिव्ह AI (GenAI) चा वापर करण्यात आला आहे. Meta च्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने “Llama” नावाच्या AI तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या प्रमाणावर सेवा सक्षम केल्या आहेत.”ही नवी WhatsApp सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज भासणार नाही. सरकारी सेवा आता एका क्लिकवर मिळणार असून, यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. तुम्हीही WhatsApp वापरत असाल, तर लवकरच तुमच्या मोबाईलवर या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment