शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार कृषी साहित्य

नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेच्या उपकर निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप व सोयाबीन चाळणी खरेदीसाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत 1,140 शेतकऱ्यांना फवारणी पंप, तर 80 शेतकऱ्यांना सोयाबीन चाळणीचा लाभ मिळणार आहे.

हे सुद्धा बघा : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.! राज्यातील या नागरिकांना सरकार देणार मोफत वीज

अनुदानाच्या रकमेचा थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून (सेस फंड) शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. कृषी विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 75% अनुदानावर बॅटरी संचालित फवारणी पंप व सोयाबीन चाळणीसाठी अर्ज मागवले होते.संबंधित योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे त्यांना अनुदान दिले जाणार आहे.

हे सुद्धा बघा : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.! राज्यातील या नागरिकांना सरकार देणार मोफत वीज

शेतकऱ्यांना 10 मार्चपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.खरेदी बिल (जीएसटी क्रमांकासह)बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रतअनुदान अर्ज व प्रतिज्ञापत्रकृषी विस्तार अधिकाऱ्यांचा तपासणी अहवालसाहित्य खरेदीनंतर अधिकाऱ्यांसोबतचा जिओ-टॅग केलेला फोटो

Leave a Comment