लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे.लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये मिळाले आहेत.या योजनेत २१०० रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लाले आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले 9 हजार रुपये यादीत नाव बघा

आता या योजनेत महिलांना २१०० रुपयांची प्रतिक्षा आहे. या योजनेत नवीन वर्षात महिलांना २१०० रुपये येऊ शकतातलाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने केले होते.परंतु लगेच पैसे वाढवून देणे ही सरकारसाठी अवघड बाब असणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार नाहीत. मात्र, मार्च किंवा एप्रिल महिन्यात २१०० रुपये येऊ शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मोठा निर्णय होऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णयानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत.लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले 9 हजार रुपये यादीत नाव बघा

त्यातील डिसेंबर महिन्याच्या पैशांचे वितरण सुरु झाले आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच २ दिवसांत सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळतील, असे सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळत आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे. ज्या महिलांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेत त्यांना आतापर्यंत ९००० रुपये मिळाले आहेत. तर त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना त्याच महिन्यापासून पैसे मिळाले आहेत

Leave a Comment