नमस्कार मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते.परंतु आता ही रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना १२००० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.कृषी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेलील असलेल्या स्थायी समितीने शिफारसी सादर केल्या आहेत मंगळवारी १७ डिसेंबर २०२४ रोजी चरणजीत सिंह चन्नी यांनी ही मागणी लोकसभेत मांडली.पीएम किसान सन्मान निधी योजनेत रक्कम मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे.
अहवालात म्हटले आहे की, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेची वार्षिक मर्यादा ६००० रुपयांवरुन १२००० रुपये करावी.पीएम किसान सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींही अर्थमंत्र्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहेत. या अर्थसंकल्पान पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १८ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता १९ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाऊ शकतो. या योजनेत प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. यावर आता प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. येत्या अर्थसंकल्पात याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.