नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसात मे महिन्याची सुरुवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात काही नवीन नियम लागू होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्व सामान्यलोकांवर होणार आहे.होय, 1 मेपासून एटीएम नियमांमध्ये (ATM New Rules) बदल होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला पैसे काढण्यासाठी आणि बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.नुकतंच देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्रस्तावला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यापासून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून व्यवहार करणे आणखी महाग होणार आहे.
हे सुद्धा बघा : फोन पे वरून मिळवा दहा मिनिटांमध्ये ५ लाख रुपये कर्ज असा करा तात्काळ अर्ज
सध्या लागू असणाऱ्या नियमांनुसार फ्री मर्यादा संपल्यानंतर, एटीएममधूनपैसे काढण्यासाठी 17 रुपये शुल्क आकारण्यात येतो मात्र 1 मे 2025 पासून हे शुल्क 19 रुपये होणार आहे. आरबीआय फ्री मर्यादा संपल्यानंतर बँकांना प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 23 रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे.नवीन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून एटीएममध्ये बॅलन्स तपासण्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 7 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सध्या बॅलेन्स तपासण्यासाठी 6 रुपये आकारण्यात येतात.मेट्रो शहरांमध्ये तुम्हाला दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून दरमहा फ्रीमध्ये तीन व्यवहार करता येतात. ज्यामध्ये रोख रक्कम काढणे, बँक बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट काढणे यांचा समावेश आहे.
हे सुद्धा बघा : फोन पे वरून मिळवा दहा मिनिटांमध्ये ५ लाख रुपये कर्ज असा करा तात्काळ अर्ज
मात्र यानंतर तुम्हाला फ्री व्यवहार संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर रोख पैसे काढण्यासाठी 19 रुपये आणि बॅलन्स तपासणीसाठी 7 रुपये द्यावे लागणार आहे.एक बँक दुसऱ्या बँकेला एटीएम सेवा देते आणि त्या बदल्यात इंटरचेंज फी आकारली जाते. आता खाजगी ग्राहकांसाठी इंटरचेंज शुल्क 19 रुपये आणि सार्वजनिक नसलेल्या ग्राहकांसाठी 7 रुपये करण्यात आले आहे. जे 1 मे 2025 पासून लागू होईल.एटीएम देखभाल, रोख व्यवस्थापन, सुरक्षा खर्च इत्यादी वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे, एटीएम व्यवहारांवरील शुल्क वाढवले जात आहे. याशिवाय, ग्राहकांना UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सारख्या डिजिटल पर्यायांकडे प्रोत्साहित करण्यासाठी RBI आणि बँकांकडून हे पाऊल उचलले जात आहे. डिजिटल पेमेंट स्वस्त आणि अधिक सोयीस्कर आहेत.