नागरिकांसाठी खुशखबर सरकार देत आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत वीज 78 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरु केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना होणार आता फार्मर आयडी कार्ड वाटप

या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जातेघरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते, तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॉटला ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते.घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता यावा, यासाठी बँकांकडून माफत व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जात आहे, तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना होणार आता फार्मर आयडी कार्ड वाटप

या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे.मोफत नेट मीटर

१) प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

२) योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते.

३) त्यांना केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते.

Leave a Comment