नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सतत नवनव्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जात असून, या निर्णयांमुळे शेती आणि शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळत आहे.राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध अनुदाने दिली जातात, त्यात ‘सिंचन विहीर योजना’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विशेष म्हणजे आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.राज्यातील कोरडवाहू जमिनींना बागायतीमध्ये बदलण्यासाठी व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA) अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शासनाने 2025 च्या नवीन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग २ (Occupant Class 2) जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग २ प्रकारातील जमीन आहे, त्यांनाही विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. सिंचन विहीर योजनेचा लाभ खालील प्रवर्गातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे:
अनुसूचित जाती (SC)
अनुसूचित जमाती (ST)
इतर मागासवर्गीय (OBC)
सामान्य प्रवर्गातील शेतकरी (OPEN)
या बदलामुळे सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला असून विशेषतः भोगवटादार वर्ग २ जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खूप मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
योजनेअंतर्गत अनुदान मर्यादा किती आहे?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
विहीर खोदकामासाठी अनुदान.
विहिरीचे रिंग बसवण्यासाठी किंवा मजबुतीकरणासाठी अनुदान.
अनुदानासाठी पात्रता निकष काय आहेत? | Eligibility Criteria for Sinchan Vihir Yojana
सिंचन विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील अटींची पूर्तता करावी लागणार आहे:
शेतकऱ्यांकडे पाणी स्रोत असल्याचे दाखल असणे आवश्यक आहे.
जमीनधारक म्हणून शेतकऱ्यांचे नाव सातबाऱ्यावर नमूद असणे गरजेचे आहे.
आता भोगवटादार वर्ग २ प्रकारात येणारे शेतकरीही पात्र असल्याने या गटातील शेतकऱ्यांसाठी लाभाची मोठी संधी निर्माण झाली आहे.
सिंचन विहीर अनुदान योजनेचा फायदा कसा घ्यावा?
जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे:
प्राथमिक नोंदणी: तुमच्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज जमा करा.