शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना होणार आता फार्मर आयडी कार्ड वाटप

नमस्कार मित्रांनो जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणीचे काम सुरू होणार असून, यासाठी क्षेत्रीय स्तरावर ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी नोंदणीचे काम करतील.कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकर्‍यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार असून यात शेतकर्‍यांच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना सेवा, सुविधा त्यातून मिळू शकतील. याद्वारे शेतकर्‍यांसाठी अ‍ॅग्रीस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार अ‍ॅग्रीस्टॅक योजनेस मान्यता देण्यात आली असुन या योजनेत राज्यातील सर्व शेतकर्‍यांचा व त्यांचा शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.Farmers will get Former Unique ID शेतकर्‍यांची नोंदणी करण्यासाठी ग्रामस्तरावर ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणीसाठी बातमी.! या तारखेपासून खात्यात 2100 रुपये जमा होण्यास होणार सुरुवात यादी तपासा

यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक शेतकर्‍यांच्या फार्मर युनिक आयडीच्या नोंदी घेणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे.Farmers will get Former Unique ID लवकरच तालुका पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोंदणीला सुरुवात होणार आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणीसाठी बातमी.! या तारखेपासून खात्यात 2100 रुपये जमा होण्यास होणार सुरुवात यादी तपासा

शेतकर्‍यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार झाल्यानंतर शेतकर्‍याला विविध योजनेचा लाभ, पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकर्‍यांचे देय नुकसान भरपाई तसेच शेतकर्‍यांनी कृषी कर्ज व इतर सेवा देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment