फार्मर आयडी कार्ड मंजूर झाल्यानंतर पुढे कशाप्रकारे डाउनलोड करायचं इथे बघा प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी (Farmer ID Card) नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचा मॅसेज येण्यास सुरवात झाली आहे. मग आता फार्मर आयडी मंजूर झाल्यानंतर ते डाऊनलोड कसे करायचे?असा प्रश्न सतावू लागला आहे.तर या लेखातून फार्मर आयडी कार्ड (Farmer ID card) कसे डाउनलोड करायचे, ते समजून घेऊया..शेतकऱ्यांची शेतजमीन, शेती पिकांची माहिती, पिकांच्या उत्पन्नाची माहिती,

हे सुद्धा बघा : आता या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत वीज प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत बदल

बाजारभावाची माहिती, जमिनीचे डिजिटलायझेशन, जमीन आधार कार्ड, जमीन मालकाची माहिती इत्यादी गोष्टी एकाच छताखाली मिळणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने अग्रिस्टॅक (Agris tack Scheme) योजनेंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन केले आहे.

अशी आहे प्रक्रिया

शेतकऱ्यांना आधार कार्डनुसार जर फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर एंटर करायचा.शेतकऱ्याचा आधार नंबर एंटर केल्याबरोबर त्या शेतकऱ्याची नोंदणी केल्याप्रमाणे माहिती दाखवली जाईल. या शेतकऱ्याचा जो युनिक आयडी बनलेला असेल, तो युनिक आयडी दाखवला जाईल.

हे सुद्धा बघा : आता या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत वीज प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत बदल

सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नसल्याने तुम्ही नोंद केलेली माहिती दाखवली जाईल.या ठिकाणी आपल्याला View Details असा पर्याय दाखवला जाईल.यावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती दाखवली जाईल.त्याचबरोबर वरील बाजूस Generate pdf किंवा Download pdf असा पर्याय देखील दिसेल.या Download pdf वर क्लिक करून त्याची प्रिंट शेतकऱ्याला देऊ शकता.

Leave a Comment