नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. त्याचसोबत अनेक सोयी-सुविधा मिळतात. अशीच एक योजना म्हणजे ई- श्रम योजना. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शनचे पैसे मिळते.परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळत नाही.
त्यामुळे या लोकांच्याभविष्यासाठी ई-श्रम योजना राबवण्यात आली आहे ई-श्रम योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला पेन्शन स्वरुपात ठरावीक रक्कम दिली जाते. यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित राहते. या योजनेअंतर्गत नागरिकांना वयाच्या ६० वर्षानंतर पैसे दिले जातात.ई-श्रम कार्डद्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४०० व्यवसायाअंतर्गत नोंदणी झालेल्या लोकांना ही मदत मिळते. या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ३००० रुपयांची पेन्शन मिळते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम कार्ड बनवले जातात.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई-श्रम पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रशन करावे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाकावा. यानंतर फॉर्म सबमिट करावा. या योजनेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २१०० रुपये यादीत नाव बघा