नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. जर लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना शिधा मिळण्यात अडचण येऊ शकतेसुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती,मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता ती 30 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.पूर्वी ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांना जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनद्वारे अंगठा स्कॅन करावा लागत होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे आणि अनेक लाभार्थी बाहेरगावी असल्याने प्रक्रिया वेळेवर पूर्ण करता येत नव्हती.
या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” ही दोन मोबाईल अॅप्स सुरू केली आहेत, ज्यामुळे नागरिकांना घरी बसूनच ई-केवायसी करणे शक्य होणार आहे.ई-केवायसी करण्यासाठी, सर्वप्रथम Google Play Store वरून “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. त्यानंतर “Mera e-KYC Mobile App” उघडून आपले राज्य आणि जिल्हा निवडावा. आधार क्रमांक प्रविष्ट करून प्राप्त झालेला OTP संबंधित ठिकाणी टाकावा. आवश्यक माहिती भरल्यानंतर “सबमिट” बटण दाबावे. त्यानंतर “Face e-KYC” पर्याय निवडून, सेल्फी कॅमेरा सुरू करून डोळे उघडझाप करून फोटो काढावा.
ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर “e-KYC पूर्ण” झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व रेशनकार्डधारकांना 30 मार्चच्या आत ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ही प्रक्रिया आता मोबाईल अॅपच्या मदतीने घरबसल्या सहज पूर्ण करता येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी दिली आहे