तुमच्या एसटी बसची लोकेशन बघा आता तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात अशाप्रकारे करा चेक

नमस्कार मित्रांनो लालपरी ही गावाखेड्यात धावते. गावातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. मात्र एसटी गावात कधी येणार किंवा स्टँडवर कधी येणार याची वाट पाहावी लागते. एसटीच्या वेळा माहित नसल्याने कधी कधी प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं.मात्र आता लवकरच प्रवाशांना एसटीचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे.राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने विकसित केलेल्या अॅपवर प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून ‘लालपरी’चे लाइव्ह लोकेशन कळणार आहे.

हे सुद्धा बघा : १२वी पास महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अंगणवाडीत १८००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; येथे करा अर्ज करा

बस स्टॅन्डवर कधी येईल, हे अचूक समजणार असल्याने त्यांना बससाठी ताटकळावे लागणार नाही. एसटीच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविल्यावर अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर येत्या काही आठवड्यांत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर नेमकी कधी येणार, याची माहिती मिळत नाही.परिणामी त्यांना ताटकळत राहावे लागते. महामंडळाने यासाठी तयार केलेल्या ‘व्हीएलटी’च्या मदतीने बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकामध्ये ती येण्याचा अपेक्षित वेळ अगोदर समजणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा बघा : १२वी पास महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अंगणवाडीत १८००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; येथे करा अर्ज करा

मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अ‍ॅप वापरता येईल. प्रवाशांना अॅपमधील ‘ट्रॅक बस’ या सुविधेत तिकिटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्यांचे थांबे हेदेखील समजणार आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, त्याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसंच, एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अ‍ॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधाही देण्यात आलीय. गाडीचा चालक व वाहक यांचीही माहिती त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून, एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोचण्यास किती वेळ लागू शकतो, आदी माहितीही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहता येणार आहे.

Leave a Comment