तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे अशाप्रकारे तपासा तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात

नमस्कार मित्रांनो तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स सक्रिय आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपल्या ओळखीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) नावाचे पोर्टल सुरू केले आहे,ज्याद्वारे आपण आपल्या नावावर नोंदणीकृत सर्व सिम कार्ड्सची माहिती मिळवू शकता.संचार साथी पोर्टलच्या मदतीने आपण आपल्या नावावर नोंदणीकृत सिम कार्ड्सची माहिती मिळवू शकता आणि अनधिकृत किंवा अनावश्यक सिम कार्ड्स बंद करण्यासाठी त्वरित कारवाई करू शकता.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांच्या खात्यात होत आहे नुकसान भरपाई जमा पटकन तुमचा मोबाईल चेक करा आले का पैसे

तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स सक्रिय आहेत ते तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा

संचार साथी पोर्टलला भेट द्या:

आपल्या इंटरनेट ब्राउझरमध्ये https://sancharsaathi.gov.in ही लिंक उघडा.

Know Your Mobile Connections’ निवडा:

होमपेजवर ‘Citizen Centric Services’ अंतर्गत ‘Know Your Mobile Connections’ किंवा ‘तुमचे मोबाइल कनेक्शन जाणून घ्या’ हा पर्याय निवडा.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांच्या खात्यात होत आहे नुकसान भरपाई जमा पटकन तुमचा मोबाईल चेक करा आले का पैसे

मोबाइल नंबर:

उघडलेल्या पृष्ठावर आपला सक्रिय मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

ओटीपी:

आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी (One-Time Password) प्रविष्ट करून ‘लॉगिन’ किंवा ‘प्रवेश’ बटणावर क्लिक करा.

सिम कार्ड्सची यादी पहा:

प्रवेश केल्यानंतर, आपल्या नावावर नोंदणीकृत सर्व सिम कार्ड्सची यादी दिसेल. या यादीतील नंबर तपासा आणि अनोळखी किंवा वापरात नसलेले नंबर ओळखा

Leave a Comment