शेतकऱ्यांसाठी खुशखबर सौर कृषी योजनेत बदल या शेतकऱ्यांचा होणार आता फायदा

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सौर कृषी पंप योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे.पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये 10 एचपी क्षमतेचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी विधानसभेत जाहीर केले.” या वर्षीच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 10 लाख पंप बसविण्याचा मानस आहे. मात्र, काही भागांमध्ये पाणीपातळी खालावल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी 7.5 एचपी व 10 एचपी पंप बसवण्यास परवानगी दिली जाईल.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! गटशेतीसाठी नवे धोरण आणले जाणार

तथापि, 7.5 एचपीपर्यंतच अनुदान मिळेल, त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी अनुदान दिले जाणार नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेशेतकऱ्यांना सिंचनासाठी किफायतशीर आणि टिकाऊ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” राबवली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप दिले जात असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे . शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक पाणी स्रोत असणे आवश्यक आहे.शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणाऱ्या नदी/नाल्याच्या जवळील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.संबंधित क्षेत्रात शाश्वत पाणी उपलब्ध असल्याचे महावितरणद्वारे पडताळले जाईल.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! गटशेतीसाठी नवे धोरण आणले जाणार

‘अटल सौर कृषी पंप योजना-1 व 2’ किंवा ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना’चा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ‘SOLAR MTSKPY’ पोर्टलला भेट द्या.‘सुविधा’ टॅबवर क्लिक करून नवीन अर्ज भरा.वैयक्तिक माहिती, पत्ता, शेती व बँक तपशील भरा.अर्ज सबमिट केल्यानंतर पोहोच पावती मिळेल.कोणत्याही अडचणीसाठी तालुका महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.सौर कृषी पंप योजनेचे फायदे विजेच्या खर्चात बचत दिवसा शेताला पाणी उपलब्ध शाश्वत सिंचनाची सुविधा केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत डिझेल व विजेच्या तुलनेत कमी खर्च राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरत असून, सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment