नमस्कार मित्रांनो बहुतांश व्यक्ती इतर कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवण्याआधी प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. कारण की, घर, जमीन, बंगले ही सर्व स्थावर मालमत्ता असते. म्हणजेच ही मालमत्ता कुठेही जात नाही.अशातच एखाद्या व्यक्ती अशा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करत असेल तर, त्याने अतिशय सावधगिरी बाळगायला हवी.
हे सुद्धा बघा : सोयाबीनच्या या बाजारभावात झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ पहा लगेच नवीन दर
सध्या मालमत्ते प्रकरणी फसवणुकीच्या बातम्या सर्रासपणे पाहायला मिळतात. प्रॉपर्टीची खेळी करणारे भामटे एकच मालमत्ता दहा वेळा रिजिस्ट्री करून लोकांना वेड्यात काढतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती पूर्णपणे फसवणुकीला बळी पडतात. अशावेळी तुम्हाला खरे रजिस्ट्री कागदपत्र आणि नकली कागदपत्र या दोघांमधील फरक समजून आला पाहिजे.
कोणताही व्यक्ती मालमत्ता खरेदी करतो तेव्हा सर्वप्रथम रजिस्ट्री कागदपत्रे अतिशय बारकाईने पाहतो.परंतु बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक नाही की, केवळ रजिस्ट्री कागदपत्रे पाहून तुमची मालमत्ता फसवणुकीच्या घोळक्यात आली आहे की नाही.. फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला जुन्या रजिस्ट्री कागदपत्रांसोबत नवीन रजिस्ट्री कागदपत्रांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुम्ही मालमत्ता खरेदी करत असाल तर आणखीन एक गोष्ट तपासून पहा ती म्हणजे, तुम्ही ज्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करत आहात त्या व्यक्तीने ही मालमत्ता कुठून खरेदी केली, त्याचबरोबर त्या मालमत्तेवर नक्की त्याचाच हक्क आहे की नाही या सर्व गोष्टींची पडताळणी करा.
हे सुद्धा बघा : सोयाबीनच्या या बाजारभावात झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ पहा लगेच नवीन दर
त्याचबरोबर तुम्ही जी जमीन खरेदी करत आहात ती सरकारची तर जमीन नाही ना. या सर्व गोष्टींची पडताळणी व्यवस्थितपणे करून घ्या. नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉपर्टी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल.. जमीन खरेदी करताना तुम्हाला ही गोष्ट देखील तपासून पहावी लागेल ती म्हणजे, तुमच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची कायदेशीररित्या कारवाई केली गेली आहे की नाही. तुम्ही ही गोष्ट तपासली नाही तर पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.