दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट.! निकाला आधी बोर्डाने दिली महत्वाची माहिती

नमस्कार मित्रांनो 10वी चा निकाल कधी लागणार असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडला आहे. दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असते.त्यामुळे निकालाआधी मुलांच्या मनात धाकधुक निर्माण होते. दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे मात्र, याबाबत बोर्डाने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, बोर्डाने निकालाआधी महत्त्वाची माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी या वर्षी किती विद्यार्थी बसले होते याबाबत बोर्डाने माहिती दिली आहे२०२४-२५ या वर्षात एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना मे महिन्यात मिळणार तीन हजार रुपये तुमचं नाव आहे का तपासा यादीत

मागच्या वर्षी २०२४ मध्ये १५,४९,३२६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेच्या बसले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दहावीची मुंबई, पुणे, नागपूर, कोकण येथे परीक्षा घेण्यात आली होती.प्रात्यक्षिक परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या काळात झाली होती. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.मागच्या वर्षी दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला होता. यात मुली अव्वल आल्या होत्या. कोकण विभागाने पहिला नंबर पटकावला होता. दरम्यान, यावर्षी दहावीचा निकाल कसा लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींना मे महिन्यात मिळणार तीन हजार रुपये तुमचं नाव आहे का तपासा यादीत

दहावीचा निकाल कसा चेक करायचा?

दहावीचा निकाल चेक करण्यासाठी दरवर्षी बोर्ड वेबसाइट जारी करते.mahahsscboard.in

mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकता. याचसोबत डिजिलॉकरवरुनदेखील निकाल डाउनलोड करु शकतात.

Leave a Comment