घरकुल योजनेत झाली मोठी वाढ खात्यात होणार आता इतके रुपये जमा

Gharkul Scheme 2025 :-नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २४-२५ आर्थिक वर्षातील टप्पा दोनमधील घरकुलांना आता ग्रामीण भागात ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घरकुलासाठी दोन लाख दहा हजारांचा निधी मिळणार आहे.सरकारने लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे.

हे सुद्धा बघा : आयकर विभागात निघाली मोठी भरती मिळणार 1 लाख रुपये पगार येथे बघा अर्ज प्रक्रिया

केंद्र सरकारच्या योजनेत प्रति घरकुल १ लाख २० हजार, नरेगा अंतर्गत २८ हजार रुपये, शौचालयासाठी १२ हजार रुपये अशी एकूण १.६० लाख रुपयांची मदत मिळत होती. आता महाराष्ट्र सरकारने यात ५० हजार रुपयांची भर घातली आहे. त्यामुळे घरकुलासाठी २ लाख १० हजाराची मदत होणार आहे. वाढीव अनुदानातून ३५ हजार अनुदान घरकूल बांधकामासाठी तर १५ हजार प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतून छतावर एक किलो वॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी दिले जातील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत.

हे सुद्धा बघा : आयकर विभागात निघाली मोठी भरती मिळणार 1 लाख रुपये पगार येथे बघा अर्ज प्रक्रिया

त्यांना १५ हजाराचे अनुदान मिळणार नाही.वाढीव आर्थिक साहाय्य लाभार्थ्यांना त्यांच्या घरांचे बांधकाम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यास मदत करेल.विशेषतः बांधकाम सामग्रीच्या वाढत्या किमती लक्षात घेता,ही वाढीव मदत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.राज्य सरकारने केवळ घरकुले देण्यापुरतीच मर्यादा न ठेवता, २० लाख लाभार्थ्यांना सौर ऊर्जा पॅनेल देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाभार्थी कुटुंबांना आजीवन मोफत वीज मिळणार आहे.विजेच्या बिलांपासून मुक्ती मिळाल्याने त्यांचा मासिक खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होईल.

Leave a Comment